06 March, 2024

जिल्हा सैनिक कल्याण कक्षातील अशासकीय शिपाई पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 06 : जिल्ह्यातील विनावेतन/मानधन तत्वावर सेवा देण्यास इच्छूक असलेल्या माजी सैनिक शिपाई किंवा इच्छूक माजी सैनिकांनी येथील जिल्हा सैनिक कक्षातील अशासकीय शिपाई पदासाठी दि. 11 मार्च, 2024 पर्यंत जिल्हा सेनिक कल्याण कक्ष, हिंगोली येथे नाव नोंदणीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. *****

No comments: