11 March, 2024

मातंग समाज, पोटजातीतील विद्यार्थ्यांकडून प्रशिक्षणासाठी 20 मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित

हिंगोली (जिमाका), दि. 11 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादिगा समाजातील विद्यार्थ्यांकडून प्रशिक्षणासाठी २० मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास होण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कर्ज योजना, उपक्रम राबवून दारिद्र्य रेषेवर आणणे हा महामंडळाच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आहे. मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीमध्ये शिक्षणाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यामुळे समाजातील गरजूंना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध व्हावे व महामंडळाचा उद्देश सफल व्हावा, यासाठी कौशल्य व उद्योजकता कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी विविध प्रशिक्षणासाठी दि. 20 मार्च, 2024 पर्यंत महामंडळाकडे अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, दर्गा रोड, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे. ******

No comments: