16 April, 2024

केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे दोन दिवशीय प्रशिक्षण पूर्ण

हिंगोली (जिमाका), दि. 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे दोन दिवशीय प्रशिक्षण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे व तहसीलदार आर. यु. सुरडकर, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, मंडळ अधिकारी संजय वाघमारे यांच्या उपस्थितीत आज गोपिका सिताराम गावंडे महाविद्यालय ढाणकी रोड उमरखेड येथे पार पडले. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना Handson Training व कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅड हाताळणी, व कंट्रोल युनिट, हाताळणी प्रशिक्षणाच्या माध्यमातून सर्व बाबीची माहिती देण्यात आली. संकलन केंद्रावर निवडणूक साहित्य आणि तपासणीबाबत माहिती देण्यात आली. या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे बदल झालेले, टपाली मतदान, 85 वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग मतदार तसेच अत्यावश्यक सेवेतील मतदार आणि निवडणूक कर्तव्यावर असलेले अधिकारी-कर्मचारी यांच्या मतदानाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. तसेच सी व्हीजील ॲप, मतदारांना नो युवर कँडीडेट यासह विविध ॲपची माहिती देण्यात आली. ******

No comments: