16 April, 2024

योगा व पथनाट्यातून मतदार जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज योगा व पथनाट्यातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. स्वीपच्या माध्यमातून आज येथील राणी सती मंगल कार्यालयात योगाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तसेच रिसाला, बसस्थानक, तहसील कार्यालय, खटकाळी, आझम कॉलनी तसेच शंकरराव चव्हाण उर्दू शाळा, राजे संभाजी विद्यालय व शिवाजी विद्यालयात मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या भागात लोकगीत, पथनाट्यातून सूर्यप्रकाश कलापथक खरवड यांच्या पथकाने जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृती कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड, स्वीपचे सदस्य विनोद चव्हाण, राजकुमार मोरगे, सुदर्शन सोवितकर हे उपस्थित होते. *******

No comments: