15 April, 2024

‘होय, मी मतदान करणारच…!’ निवडणूक निरीक्षकांचा निर्धार • उपविभागीय कार्यालयातील फलकावर स्वाक्षरी करत दिला संदेश

हिंगोली (जिमाका),दि 15 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 94-हिंगोली विधानसभा मतदार संघांतर्गत आज सहायक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयातील फलकावर स्वाक्षरी करत ‘होय, मी मतदान करणारच…!’ असा निर्धार करत निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघातील मतदारांना तुम्हीही मतदान करत लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, आचार संहिता अंमलबजावणी कक्ष नोडल अधिकारी तथा मुख्याधिकारी नगर परिषद हिंगोली अरविंद मुंढे, स्वीप पथकाचे नोडल अधिकारी गंगाधर बिरमवार, अपर तहसीलदार श्रीमती सावित्री भुरे, अपर तहसीलदार हिमालय घोरपडे आदी उपस्थित होते. मतदार जनजागृती कार्यक्रमाच्या उद्धाटन प्रसंगी श्रीमती अर्चना उपस्थित होत्या. यावेळी मतदारांना मतदान करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सूर्यप्रकाश कला पथक खरवड यांचा मतदान जनजागृतीपर संगीतमय गीतांद्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी लोकगीत, पथनाट्याद्वारे मतदार जागृतीचे सादरीकरण निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना यांच्यासमक्ष करण्यात आले. हा रथ हिंगोली विधानसभा मतदारसंघात फिरत जनजागृती करणार आहे, असे सहायक निवडणूक अधिकारी श्री. पारधी यांनी निवडणूक निरीक्षकांना सांगितले. यावेळी निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना यांनी उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत स्थापित आदर्श आचार संहिता अंमलबजावणी कक्ष आणि प्रसार माध्यम समिती कक्षास भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. तसेच जतन करण्यात आलेल्या संचिकाची पाहणी केली. यावेळी प्रसार माध्यम समिती कक्षाचे नोडल अधिकारी पंडित मस्के, प्रसार मध्यम सहायक बाळू बांगर, विजय रामेश्वरे, तसेच आदर्श आचार संहिता अंमलबजावणी कक्ष आणि प्रसार माध्यम समिती कक्षातील, प्रतिक नाईक, वसंत पुतळे, राजेश पद्मने, विनय साहू, मनोज बुर्से, दिनेश वर्मा आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. *******

No comments: