09 April, 2024

आरोग्य विभागात जागतिक आरोग्य दिन साजरा

प्रत्येकाने आपल्या आरोग्याप्रती जागृत राहून निरोगी राहावे - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके हिंगोली (जिमाका), दि 09 :आरोग्य विभागातर्फे आज जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. जागतिक आरोग्य दिनाची या वर्षाची थीम "माझे आरोग्य, माझा अधिकार" हे आहे. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी प्रत्येकाने आपल्या आरोग्याप्रती जागृत राहून आपले आरोग्य निरोगी ठेवावे, असे आवाहन केले. यावेळी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनिल देशमुख, वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण संघ डॉ. सुवर्णा महाले, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी एम. एच. पोले, जिल्हास्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक, तालुका कार्यक्रम व्यवस्थापक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, कर्मचारी उपस्थित होते. ******

No comments: