17 April, 2024

निवडणूक खर्चाची द्वितीय लेखे तपासणी शुक्रवारी

हिंगोली (जिमाका), दि. 17: हिंगोली लोकसभा मतदारसंघातून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांची द्वितीय निवडणूक खर्च लेखे तपासणी शुक्रवार, दि. 19 एप्रिल रोजी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे जिल्हा कोषागार कार्यालय हिंगोली येथे ही तपासणी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार असून, सर्व उमेदवार अथवा त्यांच्या अधिकृत खर्च प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी करून घेण्याचे आवाहन खर्च सनियंत्रण कक्षातर्फे करण्यात आले आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी खर्च निरीक्षक अन्वर अली व कमलदीप सिंह यांच्या उपस्थितीत ही तपासणी होईल. या लेखे तपासणीसाठी अनुपस्थित राहणाऱ्यांविरुद्ध निवडणूक आयोगामार्फत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील बाब क्र. 77 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे निवडणूक खर्च सनियंत्रण कक्षातर्फे कळविण्यात आले आहे. *****

No comments: