13 April, 2024

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सुलभ मतदान करता येण्यासाठी मतदान केंद्र तपासणी मोहीम

हिंगोली (जिमाका), दि 13 : हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अनुषंगाने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सुलभ मतदान होण्यासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या तपासणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या आदेशान्वये करण्यात येत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या मतदान केंद्रांच्या भौतिक सोयी सुविधाच्या अनुषंगाने तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची सुविधा, वाहन सुविधा, विद्युत व्यवस्था, इमारत व्यवस्था व इतर बाबी तपासण्यात येत आहेत. तपासणी पथकातील अधिकारी स्वतः मतदान केंद्रावर भेट देऊन आवश्यक त्या सुधारणा बाबत संबंधितांना निर्देश देत आहेत. तसेच लोकसभा निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी वसमत विधानसभा क्षेत्रातील 28 मतदान केंद्राचे तपासण्या केल्या आहेत. त्यांच्या समवेत गटविकास अधिकारी तोटावाड व इतर कर्मचारी उपस्थित होते. कळमनुरी विधानसभा क्षेत्रात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सखाराम खुणे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जोगदंड यांनी 9 मतदान केंद्रांची तपासणी केली. उर्वरीत मतदान केंद्रांच्या तपासणी पुढील दोन दिवसात पूर्ण करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी दिली आहे. *******

No comments: