14 April, 2024

मतदान केंद्रांवरील दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सोयीसुविधांची पाहणी

हिंगोली (जिमाका), दि. 14 : लोकसभा निवडणूक-2024 अनुषंगाने दिव्यांग-ज्येष्ठ नागरिकांचे सुलभ मतदान होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील मतदान केंद्रांची आज तपासणी करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या मतदान केंद्राच्या भौतिक सोयी सुविधा अनुषंगाने ही तपासणी करण्यात येत असून, त्यामध्ये दिव्यांग-ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प चेअर, पिण्याचे पाणी, टॉयलेट सुविधा, वाहन, विद्युत, इमारत व्यवस्था व इतर बाबी तपासण्यात येत आहेत. तपासणी पथकातील अधिकारी स्वतः मतदान केंद्रावर भेट देऊन आवश्यक त्या सुधारणांबाबत संबंधितांना निर्देश देत आहेत. तसेच लोकसभा निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी यंत्रणेकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्री.शेंगुलवार यांनी सांगितले. आज जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे तसेच गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड यांनी वसमत विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांना भेटी देऊन तपासणी केली. *****

No comments: