08 April, 2024

निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांच्याकडून हट्टा येथील नाक्याची तपासणी

हिंगोली (जिमाका), दि. 08 : हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वसमत, हिंगोली आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांनी आज वसमत तालुक्यातील हट्टा येथे भेट देऊन एसएसटी पथकाच्या कामकाजाची तपासणी केली. यावेळी निवडणूक निरीक्षकांसोबत सहायक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, एसएसटी पथक प्रमुख उपस्थित होते. हिंगोली लोकसभा मतदार आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना श्री. अली यांनी यावेळी पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना केल्या. श्री. अली यांनी यापूर्वी कनेरगाव नाका, उमरा फाटा येथील तपासणी नाक्याची तपासणी केली होती. तसेच मतदारसंघातील कोणत्याही नाक्याची ते अकस्मातपणे भेट देऊन तपासणी करणार असून, आदर्श आचासंहितेचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही, याबाबतची ते तपासणी करत आहेत. तपासणी नाक्यावर कोणत्याही प्रकारे पथकाकडून दिरंगाई झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांनी सांगितले. ******

No comments: