01 April, 2024

मतदान जनजागृती रथाला हिरवी झेंडी

• मी मतदान करणारच या अभियानांतर्गत स्वाक्षरी मोहीम हिंगोली (जिमाका), दि. 01 : हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या मतदान जनजागृती रथाचा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या शुभ हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. तसेच यावेळी श्री. पारधी यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात ठेवण्यात आलेल्या 'मी मतदान करणारच' या अभियानांतर्गत स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करुन उद्घाटन करण्यात आले. या मतदान जनजागृती रथाद्वारे शहरातील प्रत्येक वार्ड व ग्रामीण भागातील प्रत्येक गावा-गावामध्ये जाऊन मतदानाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी प्रत्येक मतदारांनी आपले बहुमुल्य मतदान करुन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन केले. यावेळी अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नवनाथ वगवाड, मतदान जनजागृती अभियान कक्षाचे पथक प्रमुख गंगाधर बिरामवार, मतदान जनजागृती कक्षातील सर्व अधिकारी, नायब तहसीलदार, गोळेगावकर आदी उपस्थित होते. ******

No comments: