06 April, 2024

मी मतदान करणारच ..... मोहिमेत सहभागी व्हा * मतदार जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन

' हिंगोली (जिमाका), दि. 06 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघातील नागरिकांमध्ये मतदान करून मतदानाचा टक्के वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी जिल्हास्तरीय स्वीप मतदार जागरुकता आणि सहभाग कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे स्वीपचे पथक प्रमुख प्रशांत दिग्रसकर यांनी सांगितले आहे. समितीद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक विभागीय कार्यालय येथे मतदार जनजागृती मंच स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार अभियानांतर्गंत प्रत्येक कार्यालयामध्ये मंचामार्फत मतदान जनजागृती ऑनलाईन प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय विभाग, कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना मतदान प्रक्रियेचे महत्त्व, कार्यपद्धती यांची माहिती व्हावी, मतदान प्रक्रियेविषयी आपल्याला कितपत माहिती आहे, याची जाणीव व्हावी यासाठी जिल्हास्तरीय स्वीप समितीद्वारे ही ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व अधिकारी-कर्मचारी, महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापकांनी https://forms.gle/yeeJdNKtsUtdvWou6 या लिंकवर जावून प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन जिल्हास्तरीय स्वीप समितीचे पथक प्रमुख प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे. *****

No comments: