06 April, 2024

निवडणूक निरीक्षक करणार लिंबाळा मक्ता येथील स्ट्रॉगरूमची पाहणी

हिंगोली, दि.05 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 चा कार्यक्रम घोषित केला असून, त्यानुसार 26 एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. मतदान केंद्रावरील मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी 15- लोकसभा मतदासंघातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपँट्स ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे उद्या शनिवारी, (दि.06) रोजी दुपारी निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी लिंबाळा मक्ता येथील स्ट्रॉंगरुमची पाहणी करणार आहेत. या लोकसभा मतदारसंघातील 82- उमरखेड, 83- किनवट, 84- हदगाव, 92- वसमत, 93- कळमनुरी आणि 94- हिंगोली या विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम व्हीव्हीपॅट आणि इतर संविधानिक / असंविधानिक साहित्य शासकीय तंत्र निकेतन, एम. आय. डी. सी. लिंबाळा मक्ता, येथील स्ट्रॉग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी आणण्यात येणार असून, या ठिकाणी 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी केद्रावरील स्ट्रॉंग रूम, मतमोजणी कक्ष, ईटीबीपीएस / टपाली मतपत्रिका मोजणी कक्ष, निवडणूक निरीक्षक यांचे कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कक्ष, टॅब्युलेशन कक्ष, मिडीया कक्ष, वाहन पार्किंग व्यवस्था तयार करणे व ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची सुरक्षा व्यवस्था इत्यादी कामे पार पाडण्यासाठी संबंधित अधिकारी- कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. *****

No comments: