05 April, 2024

हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

• राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध हिंगोली (जिमाका), दि. 05 : भारत निवडणूक आयोगाने हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एक निवडणूक निरीक्षक (सामान्य), एक निवडणूक निरीक्षक (पोलीस) आणि दोन निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे सर्व निरीक्षक निवडणूक कालावधीत विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, नागरिकांना भेटण्यासाठी शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे उपलब्ध असतील. भारत निवडणूक आयोगाने 15-हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी श्रीमती एम. एस. अर्चना यांची निवडणूक निरीक्षक (सामान्य) म्हणून नियुक्ती केली आहे. श्रीमती एम. एस. अर्चना या कर्नाटक केडरच्या असून, त्यांचा संपर्क क्रमांक 8263833541 आहे. श्रीमती आर. जयंथी यांची निवडणूक निरीक्षक (पोलीस) म्हणून नियुक्ती केली आहे. श्रीमती आर. जयंथी या तामिळनाडू केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. श्रीमती जयंथी यांची हिंगोलीसह नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. श्रीमती आर. जयंथी या हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे 02456-299035 या क्रमांकावर राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध असतील. निवडणूक कालावधीमध्ये पोलीस निरीक्षक श्याम डोंगरे (9881273456) हे त्यांचे संपर्क अधिकारी राहणार आहेत. खर्च निरीक्षक म्हणून श्री. अन्वर अली हे 2005 च्या आयआरएस बॅचचे अधिकारी असून, 7666878375 हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे. ते हिंगोली, वसमत आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक खर्चविषयक बाबी पाहणार आहेत. तर कमलदीप सिंह हे 2015 च्या आयआरएस बॅचचे अधिकारी असून, 9855306967 हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे. श्री.कमलदीप सिंह हे उमरखेड, किनवट आणि हदगाव या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक खर्चविषयक बाबी पाहणार आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निरीक्षणासाठी आलेले निवडणूक निरीक्षकांशी कोणत्याही राजकीय पक्षांची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. *****

No comments: