07 February, 2024

 

हिंगोली येथे 09 व 10 फेब्रुवारी रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन

ग्रंथ प्रदर्शन-विक्री, नवोदितांचे कवी संमेलन, परिसंवाद, व्याख्यानाची मेजवानी

 

 

            हिंगोली (जिमाका), दि. 07 : महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय म.रा.मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी, कार्यालय हिंगोली यांच्या विद्यमाने ‘हिंगोली ग्रंथोत्सव-2023’ चे आयोजन करण्यात आले आहे. कै.रं.रा.बियाणी नुतन साहित्य मंदिर वाचनालय, बियाणी नगर, हिंगोली येथे दि 09 व 10 फेब्रुवारी, 2024 असे दोन दिवसात ग्रंथपेमीना विविध कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे. ग्रंथप्रसार, ग्रंथप्रदर्शन व ग्रंथविक्री असा या ग्रंथोत्सवाचा उद्देश आहे. याठिकाणी ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले असून त्यात शासकीय प्रकाशने व दुर्मिळ ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

            दि. 09 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.00 वाजता कै.र.रा.बियाणी नुतन साहित्य मंदिर वाचनालय, बियाणी नगर येथून मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा शुभारंभ होणार आहे. या  दिंडीमध्ये विविध लोककला सादरीकरण लेझिम पथक, भजनी मंडळ यासह विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.

            ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. जगदीश कदम यांच्या हस्ते सकाळी 11.00 वाजता ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी जिंतेंद्र पापळकर हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे पालकमंत्री अब्दुल सत्तार, खासदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री सतिश चव्हाण, विक्रम काळे, विप्लव बाजोरीया, श्रीमती डॉ. प्रज्ञा सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, चंद्रकांत नवघरे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, ग्रंथालय संचालक अ. मा. गाडेकर, औरंगाबाद येथील सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, मुख्याधिकारी अरविंद मुंडे, प्रा. डॉ. जे. एम. मंत्री यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

            दिनांक 09 फेब्रुवारी, 2024 रोजी दुपारच्या सत्रात  "कवी संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. तर दि 10 फेब्रुवारी रोजी दुसऱ्या दिवशी सकाळी 10.00 ते 12.00 या कालावधीत “रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज" या विषयावर परिसंवाद होणार आहे.  त्यानंतर 12.00 ते 01.30 वाजेदरम्यान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात वाचनाचे महत्व या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर दुपारी 04.00 वाजता दोन दिवशीय ग्रंथोत्सवाचा समारोप व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे.  या दोन दिवसीय ग्रंथोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथोत्सव समन्वय समितीने  केले आहे.

 

*****

No comments: