15 February, 2024

 

जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

 


हिंगोली (जिमाका), दि. 15 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी  यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक रंजना कोठाळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

***** 

No comments: