17 February, 2024

लातूर येथे विभागीयस्तरीय विशेष नमो महारोजगार मेळावा

जिल्ह्यातील उद्योजक, एमओयू पार्टनर व युवक-युवतींनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी हिंगोली (जिमाका), दि. 16 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच उद्योजकांना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी नामांकित उद्योजक / इंडस्ट्रीज समवेत लातूर येथे दिनांक 23 व 24 फेब्रुवारी 2024 रोजी विभागस्तरीय विशेष नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी सहभागी होऊन याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. हा मेळावा शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन समोर, बार्शी रोड, लातूर येथे दिनांक 23 व 24 रोजी आयोजित करण्यात आला आहे. लातूर येथे होणाऱ्या विभागस्तरीय रोजगार मेळाव्यासंदर्भात जिल्हा‍धिकारी श्री. पापळकर यांनी नुकताच आढावा घेतला. यावेळी सहायक आयुक्त, जिल्हा न्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त रा.म. कोल्हे यांनी मेळाव्यासंदर्भात माहिती दिली. या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कंपन्या, उद्योजक हे सहभागी होणार असून, जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींना रोजगार करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. त्यासाठी विविध महाविद्यालयांनी या मेळाव्याबाबत माजी विद्यार्थ्यांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागप्रमुखांनी या मेळाव्याची माहिती आपआपल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावी. त्याचबरोबर जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवार या मेळाव्यामध्ये कसे सहभागी होतील, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीला व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वि.प्र. रांगणे, प्राचार्य रा औद्यागिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य आर. व्ही. बोथीकर, जिल्हा महिला बालविकास अधिकारी आर.आर. मगर, कामगार अधिकारी टी.ई. कराड, जिल्हा उद्योग केंद्राच्या वैशाली बोरकर, विविध शासकिय कार्यालयांचे प्रतिनिधी तसेच विविध कंपनींचे प्रतिनिधी उपस्थित होते. ******

No comments: