06 February, 2024

 अनुसूचित जाती प्रवर्गातील मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून महाडीबीटी प्रणालीद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील सर्व शाळांची 15 फेब्रुवारी पर्यंत शंभर टक्के अर्ज नोंदणी करावी 

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 06 :  केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सन 2023-24 पासून महाडीबीटीद्वारे ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहे.

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेमध्ये अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलामुलींना इयत्ता पहिली ते दहावी शिष्यवृत्ती, इयत्ता नववी व दहावीत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, इयत्ता पाचवी ते सातवी व आठवी ते दहावीच्या अनुसूचित जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेतील अनुसूचित जातीच्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने आदी योजनांचा समावेश आहे.

वर नमूद केलेल्या सर्व योजनांची ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी महाडीबीटी प्रणालीच्या https://prematric.mahait.org/Login/Login या वेब लिंकवर मुख्याध्यापक लॉग इन आयडी तयार करावी. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर प्री-मॅट्रिक योजनांसाठी अर्जांच्या नोंदणीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी यूजर आयडी मध्ये pre_SE27XXXXXXXXX_Prncipal आणि पासवर्डमध्ये pass@123 टाईप करुन लॉग इन करावे (SE च्या नंतर आपल्या शाळेचा UDise Code टाकावा.) . शाळेच्या प्रोफाईलमध्ये शाळेची, मुख्याध्यापकाची व लिपिकाची माहिती अद्यावत करावी. विद्यार्थ्यांच्या प्रोफाईलमध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तीक व शैक्षणिक माहिती अद्ययावत करावी. योजनेची निवड करताना संबंधित विद्यार्थी ज्या योजनेसाठी पात्र आहे त्या योजनेसाठी अर्ज नोंदणी करावी.

वर नमूद केलेल्या सर्व योजनांचे पात्र सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीमध्ये तात्काळ नोंदणी करण्यासाठी सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावरुन कार्यवाही करण्यात यावी. त्यास सर्व पालकवर्गाचे देखील सहकार्य आवश्यक राहील.

जिल्ह्यातील सर्व शाळांची दि. 15 फेब्रुवारी, 2024 पर्यंत शंभर टक्के अर्ज नोंदणी करावी. एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही यासाठी काय्रवाही करावी. याबाबत कोणतीही दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन राजू एडके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी केले आहे.

 

*******

No comments: