08 February, 2024

 

आरळ येथे ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक संपन्न

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 08 : काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकासंदर्भात निर्माण होणाऱ्या समस्यांचा शोध घेऊन त्याचे निवारण करण्यासाठी वसमत तालुक्यातील आरळ येथे ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत 20 ते 30 वयोगटातील बाल मित्रांची ग्राम बाल संरक्षण समितीत नेमणूक करणे, ग्राम बाल संरक्षण समितीचे रचनाफलक ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनी भागात लावणे तसेच महिला व बालविकास विभागामार्फत काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना याविषयी सविस्तर माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या कायदा तथा परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित यांनी दिली.

यावेळी आरळ येथील ग्राम बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष तथा सरपंच शारदाबाई राखोंडे, सदस्य सचिव तथा अंगणवाडी सेविका अन्नपूर्णा चव्हाण, आशा वर्कर अर्चना गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य माया गायकवाड, विजय राखोंडे, राजकुमार गायकवाड, प्रभाकर गायकवाड, राजामती चांदने आदी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.

******

No comments: