14 February, 2024

वापटी येथे ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक संपन्न

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 14 : काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकासंदर्भात निर्माण होणाऱ्या समस्यांचा शोध घेऊन त्याचे निवारण करण्यासाठी वसमत तालुक्यातील वापटी येथे ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत समितीचे पुनर्गठन करुन समितीत नव्याने 20 ते 30 वयोगटातील बाल मित्रांची ग्राम बाल संरक्षण समितीत नेमणूक करण्याबाबत तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकासंदर्भात निर्माण होणाऱ्या समस्यांचा शोध घेऊन त्याचे निवारण करण्यासाठी चर्चा करण्यात आली.

ग्राम बाल संरक्षण समितीचे रचनाफलक ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनी भागात लावणे तसेच महिला व बालविकास विभागामार्फत काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, बाल विवाह प्रतिबंध अधिनियम-2006  याविषयी  सविस्तर माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, चाईल्ड हेल्पलाईन प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, समुपदेशक अंकूर पाटोडे यांनी दिली.

यावेळी वापटी येथील बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामसेवक विठ्ठल पारसकर, ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य सचिव तथा अंगणवाडी सेविका दुर्गा काळे, ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य दिलीप शिंदे, आशा वर्कर वर्षा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य भागवत शिंदे, अमोल राऊत, वैभव शिंदे, भगवानराव शिंदे, चाईल्ड हेल्पलाईनचे केस वर्कर सुरज इंगळे, तथागत इंगळे तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.

****** 

No comments: