06 February, 2024

 

हिंगोली येथे जाणता राजा महानाट्य प्रयोगाचे आयोजन

14, 15 व 16 फेब्रुवारीला महाप्रयोग

 

हिंगोली (जिमाका), दि. 06 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षात राज्यात 2 जून, 2023 ते 6 जून, 2024 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. हिंगोली येथे दि. 14, 15 व 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.00 वाजता रामलीला मैदानावर जाणता राजा महानाट्य सादर करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 5 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात महानाट्याच्या आयोजनाबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, जाणता राजा चमूचे आनंद जावडेकर, विजय पवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान  प्रदान, स्थानिक कलाकारासाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवयांची माहिती  इत्यादी बाबी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हास्तरावर लवकरच महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महासंस्कृती महोत्सवाच्या आयोजनाच्या अनुषंगानेही आढावा यावेळी घेतला.

******

No comments: