16 February, 2024

परभणी येथे तीन दिवसीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन कृषी प्रदर्शनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे हिंगोली (जिमाका), दि. 16 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि परभणी आत्माल, कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने कृ‍षी तथा शेतकरी कल्यािण मंत्रालय (भारत सरकार), नवी दिल्लीी पुरस्कृ त पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनाचे परभणी येथे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या क्रीडा संकुल प्रांगणात बुधवार (दि.21)पासून तीन दिवस हे प्रदर्शन भरणार असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे. कृषि मेळाव्याात पश्चिम भारतातील महाराष्ट्रासह विविध राज्ये दीव-दमन आणि दादर नगर हवेली येथील शेतकरी, कृषी तज्ञ, कृषि संशोधक, धोरणकर्ते, कृषि कंपन्या , कृषि अधिकारी, कृषि विस्ताशरक, आणि कृषि उद्योजक हजारोच्याक संख्येोने सहभागी होणार आहेत. मेळाव्या स देशातील मंत्री महोदयांना आमंत्रित करण्याृत आले आहे. मेळाव्यााचा मुख्यष विषय ‘हवामान-अनुकूल शाश्वत शेतीद्वारे शेतक-यांची समृद्धी’ आहे. यात चर्चासत्रे, शास्त्र ज्ञ-शेतकरी संवाद आदींव्दाशरे विविध विषयावर तज्ञ मं‍डळी मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्यारचे उदघाटन केंद्रीय तसेच राज्यातील मंत्र्यांच्या हस्ते बुधवारी सकाळी 10.30 वाजता होणार आहे. कृषी मंत्री धनंजय मुंढे हे 23 फेब्रुवारी रोजी समारोपीय कार्यक्रमास विशेष अतिथी येणार असून उदघाटनास राज्य कृषी मूल्य् आयोगाचे अध्याक्ष पाशाभाई पटेल उपस्थित राहणार आहेत. हा शेतकरी मेळावा आणि कृषि प्रदर्शनाच्यार माध्येमातून राष्‍ट्रीय-आंतरराष्ट्री य पातळीवरील नाविण्यापूर्ण कृषि तंत्रज्ञान, कृषि संशोधन पाहण्याधची सुवर्ण संधी शेतकऱ्यांना उपलब्धत होणार आहे. कृषि प्रदर्शनात अद्ययावत कृषि तंत्रज्ञानावर आधारित विविध सार्वजनिक संस्थाा, खासगी कंपन्यार, अशासकीय संस्थात, शेतकरी उत्पािदक कंपन्या, आणि बचत गट यांच्याा 200 पेक्षा जास्तव दालनाचा समावेश राहणार आहे. यात विशेषत: दर्जेदार बी-बियाणे, रोपे, खत, किटकनाशके, कृषि औजारे, कृषी निविष्ठा, डिजिटल तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, आधुनिक सिंचन पद्धती, पशुधन इत्या्दी दालनांचा समावेश राहील. याप्रसंगी पीक प्रात्यक्षिक भेटी आणि खाद्य महोत्सयवाचेही आयोजन करण्याचत आले आहे. सर्व कृषि बांधव, कृषि उद्योजक, कृषि अधिकारी आणि कृषि विस्ता‍रक यांनी कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. *****

No comments: