15 February, 2024

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत

संपृक्तता साध्यतेसाठी गावपातळीवर विशेष मोहिम

 

  • जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी 21 फेब्रुवारी पर्यंत आवश्यक बाबींची पूर्तता करावी

 

हिंगोली (जिमाका), दि. 15 :  शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत संपृक्तता (Saturation) साध्यतेसाठी राज्यात दि. 6 डिसेंबर, 2023 ते 15 जानेवारी, 2024 या कालावधीत राबविलेल्या मोहिमेत शेतकऱ्यांचे ई-केवायसो प्रमाणिकरण, स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली.

हिंगोली जिल्ह्यातील 1 लाख 76 हजार 519 शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी आवश्यक इतर सर्व बाबीची पूर्तता केलेली असून त्यांच्यातील केवळ 2 हजार 329 लाभार्याचे ई-केवायसी करणे बाकी आहे. तसेच 1 हजार 31 भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे व 2 हजार 107 आधार बँकेशी संलग्न करणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांचे मुख्यतः सामाईक सुविधा केंद्रामार्फत (CSCs) अथवा प्रामस्तरीय नोडल अधिकारी इत्यादीमार्फत ई-केवायसी (eKYC) प्रमाणिकरण करण्यासाठी दि. 12 फेब्रुवारी ते दि. 21 फेब्रुवारी 2024 या कालावधीत गावपातळीवर आणखी 10 दिवसांची देशव्यापी संपृक्तता विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमे दरम्यान केवळ ई-केवायसी (Ekyc) प्रमाणिकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नजिकचे सामाईक सुविधा केंद्र व ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (VNOs) यांचे मार्फत ई-केवायसी (eKYC) प्रमाणिकरण पूर्ण करावे. शेतकऱ्यांनी स्वतःचे ई-केवायसी प्रमाणिकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पी एम किसान फेस ऑथेंटिकेशन अॅप या सुविधांपैकी कोणत्याही एका सुविधेचा वापर करावा.

पी.एम. किसान योजनेअंतर्गत ई-केवायसरी प्रमाणिकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकन्यांनी समक्ष हजर असणे आवश्यक आहे. बँक खाती आधार संलग्न करणे बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या सोईनुसार प्रधान्याने नजीकचे पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे. केंद्र शासन पी. एम. किसान योजनेचा 16 वा हफ्ता माहे फेब्रुवारी, 2024 च्या शेवटच्या आठवड्यात वितरीत करणार आहे. तसेच पी.एम. किसान योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थीनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा होईल. या मोहिमे दरम्यान जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या दोन्ही योजनांच्या लाभासाठी दि. 21 फेब्रुवारी, 2024 पर्यंत आवश्यक बाबींची पूर्तता करावी, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि सहाय्यक /कृषि पर्यवेक्षक /मंडळ कृषि अधिकारी (तालुका कृषि अधिकारी व सामाईक सुविधा केंद्र यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*******

No comments: