12 February, 2024

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सर्व परीक्षांचे निकाल

संकेतस्थळावर जाहीर

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 12 :  महाराष्ट्र राज्य  परीक्षा परिषद, पुणे मार्फत  डी.एल.एङ परीक्षा, जी.सी.सी. परीक्षा, जी.सी.सी.-टी.बी.सी. परीक्षा, एन.एम.एम. एस. परीक्षा या परीक्षांचे आयोजन  करण्यात आले होते. डी.एल.एड परीक्षा-2023 परिक्षेचे आयोजन दि. 13 ते 21 डिसेंबर, 2023 या कालावधीत  करण्यात आलेले होते. जी.सी.सी.परीक्षा-2023 परीक्षेचे आयोजन दि. 8 ते 10 डिसेंबर, 2023 या कालावधीत करण्यात आलेले होते. तसेच जी.सी.सी.- टी.बी.सी. परीक्षा-2023 या परीक्षेचे  आयोजन  दि. 18 ते 20 डिसेंबर 2023 व 21 ते 22 डिसेंबर, 2023 या कालावधीत  करण्यात आलेले होते. तसेच एन.एम.एम.एस.परीक्षा-2023 चे आयोजन दि. 24 डिसेंबर, 2023 रोजी सदर परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले होते.

            वरील सर्व परीक्षांचे निकाल दि. 7 फेब्रुवारी, 2024 रोजी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले आहेत, असे डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

******

No comments: