06 February, 2024

 राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसिध्दी चित्ररथाचा

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रारंभ

 



हिंगोली (जिमाका), दि. 06 :  जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-2024 अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना यासह विविध योजनांची तसेच अनुसूचित जाती उपयोजना सन 2023-2024 अंतर्गंत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनाची जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती व जनजागृती होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित चित्ररथाला आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रचार-प्रसिद्धी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. हे चित्ररथ जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात जाऊन प्रचार-प्रसिध्दी करणार असल्याने नागरिकांना तसेच लाभार्थ्यांना या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुलां-मुलीसाठी शासकीय वसतिगृह, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना, रमाई आवास योजना (घरकुल) यासह विविध शासनाच्या कल्याणकारी योजनाची जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती व जनजागृती होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित हे चित्ररथ जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात जाऊन प्रसिध्दी करणार आहे. त्यामुळे या चित्ररथाच्या माध्यमातून पात्र व गरजू नागरिक तसेच लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

            चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यासोबतच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना, बालविवाह प्रतिबंधक कायदा : सन 2006, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना आणि अनुसूचित जाती उपयोजनाअंतर्गत मागासवर्गीय मुलां-मुलीसाठी शासकीय वसतिगृह, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना, रमाई आवास योजना (घरकुल) या कल्याणकारी योजनांवर आधारित तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिकाचे देखील मान्यवरांच्या हस्ते यावेळी विमोचन करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी, कैलास लांडगे आदींची उपस्थिती होती.

*****

No comments: