09 February, 2024

 

पारधी जमातीच्या लाभार्थ्यांनी वैयक्तीक लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

 

            हिंगोली (जिमाका), दि. 09 :  पारधी विकास योजना सन 2023-24 अंतर्गत पारधी जमातीच्या आदिवासी शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर  घेण्यासाठी अर्थसहाय करणे, पारधी जमातीचे लाभार्थ्यांना शेळी गट पूरवठा करणे, पारधी  जमातीचे  12 पास मुलांमुलींना शैक्षणिक  विकास व रोजगार उपलब्ध  होण्यासाठी लॅपटॉप  खरेदी करण्यासाठी अर्थसहाय करणे व पारधी वस्ती/ बेड्यावर  बालसंस्कार केंद्र चालविणे या वैयक्तीक लाभाच्या योजनेसाठी हिंगोली जिल्ह्यातील पारधी जमातीच्या युवक-युवती, महिला, पुरुष शेतकरी लाभार्थ्यांकडून मंजूर विविध योजनासाठी दि. 23 फेब्रुवारी, 2024 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत.

यासाठी लाभार्थ्यांनी वरील कालावधीमध्ये प्रकल्प अधिकारी,  एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प कार्यालय. कळमनूरी  जि. हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी,  एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प कार्यालय. कळमनूरी  जि. हिंगोली यांनी केले आहे.

योजनानिहाय नाव व त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, अटी, शर्ती यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

पारधी जमातीच्या आदिवासी शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर घेण्यासाठी अर्थसहाय करणे : अर्जदार हा हिंगोली जिल्ह्यातील व पारधी जमातीचा असावा. स्वत:ची शेतजमीन  असणे आवश्यक आहे. सक्षम अधिकाऱ्याचे सहीचे जात प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, आधारकार्ड, राशनकार्ड, तहसिलदाराचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, सातबारा, होल्डींग प्रमाणपत्र, नजिकच्या काळातील दोन पासपोर्ट फोटो, लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना शेळी गट पुरवठा करणे : अर्जदार हा हिंगोली जिल्ह्यातील  व पारधी जमातीचा असावा. स्वत:ची जागा असणे आवश्यक आहे. सक्षम अधिकाऱ्याचे सहीचे जात प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, आधारकार्ड, तहसीलदाराचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, राशन कार्ड, सातबारा, होल्डींग प्रमाणपत्र, नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट फोटो, लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे .

पारधी  जमातीच्या 12 वी पास मुलांमुलींना शैक्षणिक विकास व रोजगार उपलब्ध  होण्यासाठी लॅपटॉप  खरेदी करण्यासाठी अर्थसहाय करणे : अर्जदार हा हिंगोली जिल्ह्यातील  व पारधी जमातीचा असावा. लाभार्थी  हा 12 वी उत्तीर्ण असावा. लाभार्थ्यांचे वय अर्जाचे दिवशी 40  वर्षाचे आत असावे. शैक्षणिक पात्रतेचे  प्रमाणपत्र, सक्षम अधिकाऱ्याचे सहीचे जात प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, आधारकार्ड, तहसीलदाराचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, राशनकार्ड, नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट फोटो, व्यावसायिक  अभ्यासक्रम व पीजीच्या लाभार्थ्यांना  प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच  लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

पारधी वस्ती/ बेड्यावर  बालसंस्कार केंद्र चालवणे : हिंगोली जिल्ह्यातील वस्ती/ बेड्यावर बालसंस्कार केंद्र चालवणे बंधनकारक राहील. बालसंस्कार केंद्रामध्ये  पारधी बोली भाषेतून शिक्षण देणे  बंधनकारक  राहील. बालसंस्कार केंद्रामध्ये 4 ते 11 वर्षाचे बालकांना प्रवेश देता येईल(फक्त पारधी जमातीचे). बालकांना दोन गणवेश, बुट, मोजे, खाऊ व इतर शैक्षणिक साहित्य देणे बंधनकारक राहील. यासाठी इच्छूक सेवाभावी संस्थेने अर्ज करावेत.

******

No comments: