16 February, 2024

नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आज गृहोपयोगी वस्तूंचे वाटप

हिंगोली (जिमाका), दि. 16 : राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूचे संच (भांडे) उद्या शनिवार, दि. 17 फेब्रुवारीपासून टप्याटप्याने वितरीत करण्यात येणार आहेत. उद्या पहिल्या टप्प्यातील वितरण मे. मफतलाल इंडस्ट्रीज गोडाऊन, प्लॉट.क्र. बी-84, एमआयडीसी, हिंगोली येथे करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात दि. 31 मे, 2023 पर्यंत नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांना हे संच वितरीत करण्यात येणार आहेत. आधी नोंदणी झालेल्या कामगारांना आधी लाभ मिळणार असून त्यानंतर नोंदणी झालेल्या सर्व बांधकाम कामगारांना टप्याटप्याने वितरण होईल. वितरणाच्या ठिकाणी एकाच दिवशी हजारो कामगारांनी एकत्र येऊन गोंधळ उडू नये यासाठी मंडळाने ही खबरदारी घेतली आहे. तसेच शासन निर्णयानुसार एका कुटुंबातील एकाच लाभार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाईल. या लाभापासून कोणताही कामगार वंचित राहणार नाही यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरकारी कामगार अधिकारी टी. ई.कराड यांनी केले आहे. *******

No comments: