13 March, 2023

 

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 20 फेब्रुवारी रोजी

वसमत येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 13 :  येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॅशनल कॅरिअर सर्व्हिस, वसमत येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 20 मार्च, 2023 रोजी हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळावा यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), वसमत येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदवीधर या पात्रतेचे सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी ऑनलाईन सहभाग घेऊन स्वत: मूळ कागदपत्रासह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), नवोदय विद्यालयाच्या समोर, परभणी रोड, वसमत येथे दि. 20 मार्च, 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा 7385924589 या भ्रमणध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

*****

No comments: