09 March, 2023

 

हिंगोली येथील रोजगार मेळाव्यात नऊ बेरोजगार उमेदवारांची निवड

 

हिंगोली (जिमाका), दि. 09 :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर (एनसीएस) हिंगोली येथे दि. 8 मार्च, 2023 रोजी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जागेवरच निवड संधी मोहिमेअंतर्गत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या रोजगार मेळाव्यात महिंद्रा मनसा व मनसा मोटर्स हिंगोली व जस्टडायल लि.पुणे या कंपनीचे उद्योजक उपस्थित होते. जागेवरच निवड संधी या विशेष मोहिमेअंतर्गत रोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा व पदवी तसेच पदवीधारक पात्रतेचे 41 उमेदवार उपस्थित होते. या 41 उमेदवारांपैकी 09 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. यावेळी मेळाव्यास उपस्थित उमेदवारांना नवनाथ टोनपे (यंग प्रोफेशनल) यांनी करिअर संबंधी मार्गदर्शन केले.

****

No comments: