03 March, 2023

 

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी

तोष्णीवाल महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर भेट देऊन गणित पेपरची केली पाहणी

 





हिंगोली (जिमाका), दि. 03 :  आज जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी सेनगाव येथील तोष्णीवाल महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रास अचानक भेट देऊन तेथे सुरु असलेल्या बारावीच्या गणित विषयाच्या पेपरची पाहणी केली. यावेळी  शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के उपस्थित होते.

इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित विभागाची बैठक घेऊन यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. आज सेनगाव येथील तोष्णीवाल महाविद्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भेट दिली असता येथील परीक्षा प्रक्रियेची माहिती घेतली. तसेच बैठ्या पथकाने परीक्षा केंद्रावर सतत फिरत रहावेत आणि भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडाव्यात. अशा सूचना  केल्या.

 

*****

No comments: