21 March, 2023

 

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते

महा पशुधन एक्स्पो-2023 लोगोचे अनावरण

 



            हिंगोली (जिमाका), दि. 21  :  पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देशातील सर्वात मोठा महा पशुधन एक्स्पो-2023 हा कार्यक्रम दि. 24 ते 26 मार्च या कालावधीत शिर्डी येथे आयोजित केला आहे. या महापशुधन एक्स्पो-2023 च्या लोगोचे अनावरण जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज करण्यात आले.  

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. डी. ए. टाकळीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

            शिर्डी येथील महा पशुधन एक्स्पो पशु प्रदर्शनात हिंगोली जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र स्टॉल देण्यात येणार असून या स्टॉलमध्ये जिल्ह्याची वैशिष्ट्यपूर्ण माहिती प्रदर्शित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर येथील महादेव नारायण अकमार यांची देवणी जातीची गाय व कालवड सहभागी होणार आहे.  हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत शेतकरी व पशुपालकांनी सहभागी होऊन प्रदशर्नाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. डी. ए. टाकळीकर यांनी केले आहे.

*****

No comments: