16 March, 2023

 

जिल्हा कृषि महोत्सव यशस्वी करण्यासाठी

आपणास दिलेली जबाबदारी समन्वयाने पार पाडावी

- अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

 


            हिंगोली (जिमाका), दि. 16 :  जिल्हा कृषि महोत्सवाचे दि. 25 मार्च ते 28 मार्च, 2023 या कालावधीत येथील रामलीला मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. हा जिल्हा कृषि महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणानी  आपणास दिलेली जबाबदारी  परस्पर समन्वयाने पार पाडावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिले.

जिल्हा कृषी महोत्सवाच्या आयोजनाच्या पूर्वतयारीबाबत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी  यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे, कृषि उपसंचालक शिवसांब लाडके, नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड, सर्व तालुका कृषि अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके, रेशीम विकास अधिकारी पी. एस. देशपांडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. डी. ए. टाकळीकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. स्मिता उके यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

            यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी जिल्हा कृषि महोत्सवात प्रदर्शन स्टॉल लावणे, वाहन व्यवस्था, पार्कींग, प्रदर्शनाच्या ठिकाणी वीज, पाणी, फिरते शौचालय यासह आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. तसेच या महोत्सवानिमित्त चार दिवस राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रम, चर्चासत्र, उपक्रमाची माहिती घेऊन आपणास सोपविण्यात आलेली जबाबदारी वेळेत व यशस्वीपणे पार पाडावी, अशा सूचनाही श्री. परदेशी यांनी  दिल्या. 

****

No comments: