21 March, 2023

 

वसमत येथील रोजगार मेळाव्यात 215 बेरोजगार उमेदवारांची प्राथमिक निवड

 

हिंगोली (जिमाका), दि. 21  :  जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर (NCS) हिंगोली व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 20 मार्च, 2023 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसमत येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या रोजगार मेळाव्यास जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा व पदवी तसेच पदवीधारक या पात्रतेचे 513 उमेदवार उपस्थित होते. यापैकी 215 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

या रोजगार मेळाव्यात धूत ट्रान्समिशन छत्रपती संभाजी नगर, परम स्कील ट्रेनिंग इंडिया प्रा. लि. छत्रपती संभाजी नगर, आर्मस इ.प्रा.लि. बाळूज छत्रपती संभाजी नगर, टॅलेनसेतू सव्हिस प्रा.लि. पुणे, नवभारत फर्टिलायझर छत्रपती संभाजी नगर, भारतीय जीवन विमा निगम परभणी, क्वेस कॉर्प लिमिटेड पुणे, जस्ट डॉयल पुणे, मनसा मोटर्स प्रा.लि. हिंगोली, महिंद्रा मनसा प्रा. लि. हिंगोली, एसबीआय लाईफ इन्शुरंस हिंगोली, नवकिसान बायोटेक लिमिटेड नांदेड अशा महाराष्ट्रातील नामांकीत कंपनीचे उद्योजक उपस्थित होते.

उमेदवारांना उद्योग व्यावसाय करण्यासाठी हिंगोली जिल्हा कार्यालयातील संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, अण्णासाहेब आर्थिक विकास मागास महामंडळ या सर्व महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना करिअर कसे निवडावे याबाबत मार्गदर्शनासाठी नॅशनल करीअर सेंटरची जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली या कार्यालयात स्थापना करण्यात आली आहे. अशी माहिती नवनाथ टोनपे (वायपी) यांनी दिली आहे.

 

*****


No comments: