03 March, 2023

 

दहावी, बारावी परीक्षेसाठी जिल्हानिहाय समुपदेशक नियुक्त

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 :  औरंगाबाद विभागीय मंडळाच्या वतीने बारावीची परीक्षा दि. 21 फेब्रुवारी पासून व दहावीची परीक्षा 02 मार्च पासून सुरु झाली आहे. परिक्षेसंदर्भात विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना मानसिक ताण अथवा दबाव, परीक्षा संदर्भात मदतीची आवश्यकता भासल्यास शंका निरसनासाठी औरंगाबाद विभागीय मंडळाने जिल्ह्यातील समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मोहन केशव पाटील, नागनाथ विद्यालय, औंढा नागनाथ (मो. 9421858672), संजय गंगाराम खिल्लारे, जिल्हा परिषद प्रशाला, येहळेगाव (सो) (मो. 9011594944), दिलीप आर. चव्हाण, चं.गो. मंडळ हायस्कूल, सिरसम (मो. 9421175454) याप्रमाणे आहेत.

दहावी व बारावी परिक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशकांनी वरील हेल्पलाईनद्वारे सकाळी 8.00 ते संध्याकाळी 8.00 पर्यंत मोफत समुपदेशन करणार आहेत.

जिल्ह्यातील परिक्षार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण संस्था हिंगोली, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: