09 March, 2023

 

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा क्रीडा कार्यालयात

महिलांना दिले आत्म रक्षणाचे प्रशिक्षण

 




हिंगोली (जिमाका), दि. 09 :  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि. 08 मार्च 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा मक्ता ता.जि. हिंगोली येथील मल्टीपर्पज हॅाल येथे राणी लक्ष्मीबाई नारी सुरक्षा समितीच्या महिलांसाठी आत्मरक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आम्रपाली विजय डोंगरे तर प्रमुख पाहुणे म्हणुन दिक्षा गोपाल इसावे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, कराटे प्रशिक्षक सुनिल कांबळे, कराटे प्रशिक्षक गोपाल इसावे, किक बॅाक्सिंग प्रशिक्षक विजय डोंगरे, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, वरिष्ठ लिपीक आनंद सुरेकर, आंतरराष्ट्रीय खेळाडू नितीन चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते नामदेव राठोड, गणेश ठोको, लोणकर आदी उपस्थित होते.

पुरातन काळापासून स्त्रीला अनन्य महत्व असून स्त्री ही अनन्य काळाची माता आहे, असे संबोधिले जाते. तसेच स्त्रीला देवीचे रुपही मानले जाते. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. हिंगोली जिल्हा कराटे असोसिएशन यांच्या महिला कराटे खेळाडूंनी स्वयंसंरक्षणाचे धडे कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांना दिले. महिलांनी स्वत:च्या पायावर सक्षमपणे कसे उभे रहावे याचे मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी स्वत:चे संरक्षण करण्यासाठी स्वयं:सिद्धाच्या माध्यमाने आत्मरक्षणाचे प्रशिक्षण घेतले. कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील औंढा (ना), हिंगोली, कळमनुरी, सेनगांव, वसमत तालुक्यातील मोठ्या प्रमाणात महिला प्रशिक्षणासाठी उपस्थित होत्या. त्यांनी स्वत:चे रक्षण कऱण्यासाठी आत्मरक्षा प्रशिक्षण घेतले, आलेल्या कठीण प्रसंगाला समोर जाण्यासाठी  सेल्फ डिफेन्सच्या माध्यमाने आपला बचाव करण्यासाठी प्रशिक्षण घेतले. समाजात वावरतांना निर्भयपणे कसे वावरता येईल, स्वत:चा कठीण प्रसंगात बचाव कसा करता येईल याचे ज्ञान घेतले. या प्रशिक्षणातून महिलांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. महिला दिनानिमित्त महिला खेळाडूंचा सत्कारही करण्यात आला व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. थोर महिला रणरागिनांचा या प्रसंगी उल्लेख करुन गौरव करण्यात आला.

****

No comments: