23 March, 2023

 

शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 23 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दिनांक 23 मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.    

            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, नायब तहसीलदार  डी. एस. जोशी, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक रंजना कोठाळे तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  

*****

No comments: