16 March, 2023

 शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास दौरा सहलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना



 

हिंगोली (जिमाका), दि. 16 : मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट सन 2022-23  VCDS मध्ये राज्याबाहेर शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास दौरा आज दिनांक 16 मार्च, 2023 पासुन सुरु झाला आहे. हा अभ्यास दौरा दि. 16 मार्च ते 22 मार्च, 2023 पर्यंत राहणार आहे. या दौऱ्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे व प्रकल्प संचालक (आत्मा) तथा जिल्हा अमलबजावणी कक्ष (स्मार्ट ) युवराज शहारे यांनी हिरवी झेंडू दाखवून सहल रवाना केली.

समुदाय आधारित संस्था यांची संचालक, सभासद हे राष्ट्रीय संशोधन केंद्र इंदौर, केव्हीके (KVK) उज्जैन, एसओपीए (SOPA) इंदोर येथे भेट देणार आहेत.

यावेळी नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड, पुरवठा  तज्ञ जी. एच. कच्छवे, समुदाय आधारित संस्था यांचे संचालक व सभासद हजर होते.

*****

No comments: