16 March, 2023

 

महिलांनी  कुंटुंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी

बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरु करण्याची गरज

-- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

* महिला बचत गटाच्या उत्पादित मालाचे जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते उद्घाटन

 





हिंगोली (जिमाका), दि. 16 : जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाचे काम खूप चांगल्या पद्धतीने सुरु आहे. ही बाब अभिमानास्पद आहे. बचत गटाच्या माध्यमातून घरातील एक जरी  महिला उद्यमी झाली आणि व्यवसायाला सुरुवात केली तर त्या कुटुंबामध्ये आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. त्यामुळे महिलांनी कुंटुंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरु करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी  केले.

येथील महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत महिला बचत गटाच्या उत्पादित मालाचे विक्री प्रदर्शन आज वाशिम रोड वरील रामलीला मैदाना जवळ असलेल्या महावीर भवन येथे आजपासून भरवण्यात आले आहे. या महिला बचत गटाच्या उत्पादित मालाचे जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, अमरावतीचे विभागीय संसाधन व्यक्ती केशव पवार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, निर्भय नारी फाऊंडेशनच्या अध्यक्षा उषा पाटील, आरसेटीचे संचालक धनराज बोईले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रास्ताविकात महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी  विलास जगताप यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासन अंगीकृत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत महिला बचत गटाच्या उत्पादित मालाचे भव्य जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याची व कार्यक्रमाच्या आयोजनाची  भूमिका विशद केली. जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव जाधव यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी  विलास जगताप, लेखाधिकारी संकेत महाजन, व्यवस्थापक विलास पंडित यांनी केले.  

या महिला बचत गटाच्या उत्पादित मालाचे भव्य जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनात 43 स्टॉल लावण्यात आले आहेत. यावेळी ग्राहकांनी देखील स्टॉल पाहण्यासाठी  व या प्रदर्शनाच्या माध्यमातून खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाचा आजचा पहिला दिवस असून दिनांक 17 व 18 मार्च असे दोन दिवस हे प्रदर्शन राहणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा समन्वय अधिकारी विलास जगताप यांनी केले आहे.

*******

No comments: