03 March, 2023

 

संघटनेद्वारे स्वयंअर्थसहाय्याने शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी

9 मार्च पर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे  व जिल्हा क्रीडा परिषद हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात संघटनेद्वारे स्वयंअर्थसहाय्याने शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.

यासाठी हिंगोली जिल्ह्यातील पॉवर लिफ्टींग, टेनिस हॉलीबॉल, फ्लोअर बॉल, जंप रोप, मिनी गोल्फ, टेनिस क्रिकेट, डॉप रो बॉल, रस्सी खेच, सुपर सेवन क्रिकेट, सिलबंम, बीच हॉलीबॉल, टेनिल बॉल क्रिकेट, जीत कुने दो, फुटबॉल टेनिस, कार्फ बॉल, मोनटेक्स बॉल क्रिकेट, रोप स्किपींग, म्युझिकल चेअर (ग्रामीण), टारगेट बॉल, फुटसल, लंगडी, पेटानक्यू, वुडबॉल, आस्टे डु आखाडा, फिल्ड आर्चरी, चॉकबॉल, स्पीड बॉल, युनिफाईड, स्पोर्टस् डान्स, चायक्वांदो, थांगता मार्फल आर्ट, वुडबॉल, बेल्ट रेसलिंग, पेन्टयाक्यू, हाफ किडो बॉक्सींग, लंगोरी, लंगडी, कुराश, ग्राफलिंग या खेळ संघटनांनी जिल्हा क्रीडा कार्यालय, हिंगोली कार्यालयाशी संपर्क करुन आपल्या संघटनेमार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धांचा कार्यक्रम व स्पर्धा आयोजनाचे ठिकाण व आयोजनाची तारीख निश्चित करण्यासाठी आपल्या खेळ संघटनेस राज्य संघटनेची मान्यता असल्याचे पत्र इत्यादी कागदपत्रे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे दि. 9 मार्च, 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा ह्या संघटनेद्वारा स्वयंअर्थसहाय्याने आयोजित करावयाच्या असून वरीलप्रमाणे संघटनेद्वारा आयोजित क्रीडा स्पर्धांची नावे व वरील बाबींची नोंद घेऊन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

*****

No comments: