15 March, 2023

 

मोटार सायकल संवर्गासाठी नवीन वाहन क्रमांक मालिका चालू

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 15 :  येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील यापूर्वीची मोटार सायकल संवर्गासाठी असलेली एमएच-38-एई ही मालिका संपुष्टात आल्यामुळे मोटार सायकल संवर्गासाठी एमएच-38-एएफ-0001 ते 9999 ही नवीन मालिका चालू करण्यात आली आहे.

ज्या वाहन मालकांना वाहनासाठी आकर्षक क्रमांक राखीव करावयाचा आहे त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधून आपला आकर्षक क्रमांक विहित शासकीय शुल्क भरुन राखीव करुन घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन  अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे.

****

No comments: