13 September, 2023

 

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त

14 सप्टेंबर रोजी शिक्षक काव्य मैफिलीचे आयोजन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 13 : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत स्व. खा. शिवाजीराव देशमुख सभागृहात दि. 14 सप्टेंबर, 2023 रोजी सांय. 4.00 वाजता शिक्षक काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या काव्य मैफिलीस प्रमुख अतिथी म्हणून सिध्द हस्त कवी प्रा. इंद्रजित भालेराव उपस्थित राहणार आहेत.

या काव्य मैफिलीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

******

No comments: