12 September, 2023

 

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 12 : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने लिंबाळा मक्ता येथील जिल्हा क्रीडा संकुलावर दि. 13 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कुस्ती स्पर्धा वजन गटानुसार घेण्यात येणार आहेत.

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील कुस्ती पटूंनी सहभागी व्हावे. तसेच कुस्तीप्रेमी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.

******

No comments: