18 September, 2023

 बसमतनगर आयटीआयमध्ये पीएम स्किल रन मॅरेथॉन व पदवीदान सोहळा संपन्न



 

हिंगोली (जिमाका), दि. 18 : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बसमतनगर अंतर्गत दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिना सोबतच भगवान विश्वकर्मा जयंती निमित्त व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पीएम स्कील रन या 5 कि.मी. मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विजेत्यांना अनुक्रमे 3 हजार, 2 हजार, 01 हजार असे पारितोषिक व प्रशस्तीपत्र देण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य एस.एल. कोंडावार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य नितीन आंबेकर हे उपस्थित होते.

तसेच संस्थेमध्ये सन 2023 मध्ये संस्थेतून विविध ट्रेंड मधून पास आऊट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पदवीदान समारंभाचे आयोजन करुन संस्थेतून सर्व ट्रेड मधून प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्यां विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य नितीन आंबेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कानगुले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेतील निदेशक श्री. बुंदेले, श्री. वानखेडे, श्री.रत्नपाल कंधारे, कु.हनमंतकर , कु. शहारे, विशाल दळवी, श्री.वायवळ, श्री.साळवे, श्री.भालेराव, श्री.गायकवाड तसेच मेस्को कर्मचारी श्री.मुनीर, कांबळे, रेडे, कदम यांनी  विशेष परिश्रम घेतले.

***** 

No comments: