16 September, 2023

 रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांचा हिंगोली दौरा

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 16  :  राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे हे दि. 17 सप्टेंबर, 2023 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

रविवार, दि. 17 सप्टेंबर, 2023 रोजी पहाटे 5.00 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून शासकीय वाहनाने समृध्दी महामार्गाने हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 8.00 वाजता हिंगोली येथे शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सकाळी 9.00 वाजता देवडा नगर येथील नगर परिषदेच्या उद्यानात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन समारंभास उपस्थिती. सकाळी 10.00 वाजता हिंगोली येथून माजलगाव जि. बीड कडे प्रयाण .

*****

No comments: