18 September, 2023

 

शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारासाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

                       

                                                                                     

            हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर (एनसीएस) हिंगोली यांच्यामार्फत हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी       दि. 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर, 2023 या कालावधीत पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

नवकिसान बायोप्लॉटेक लिमिटेड, नांदेड या कंपनीमध्ये सेल्स एक्झीकेटीव्ह पदासाठी दहावी, बारावी, पदवी, पदवीधर शैक्षणिक पात्रतेची हिंगोलीचे-10, परभणी-10 व नांदेड-20 जागा 18 ते 45 वयोगटातील उमेदवारामधून भरावयाची आहेत. या पदासाठी 7 हजार ते 14 हजार रुपया पर्यंत मासिक वेतन असणार आहे.  

या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात नवकिसान बायोप्लॉटेक लिमिटेड, नांदेड या कंपनीचे 40 पेक्षा अधिक रिक्तपदे अधिसूचित केलेली आहेत. जिल्ह्यातील दहावी, बारावी, पदवी, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार https://rojgar.mahaswayam.gov.inwww.ncs.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत.

नोकरी इव्छुक उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदासाठी ऑनलाईन अर्ज करावेत. जेणे करुन त्यांना ऑलनाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल. याबाबत काही अडचण आल्यास 7385924589 या भ्रमणध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

*****  

No comments: