13 September, 2023

 

आयुष्यमान भव मोहिमेचा जिल्ह्यात शुभारंभ

मान्यवरांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना गोल्डन कार्डचे वाटप

 



हिंगोली, (जिमाका) दि. 13  :  जिल्ह्यात जिल्हा प्रशिक्षण केंद्र येथे आयुष्यमान भव या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते  करण्यात आले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. कैलास शेळके,  अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. दीपक मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी  डॉ. विठ्ठल करपे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक  श्रीपाद गारुडी इत्यादी उपस्थित होते.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये 4 लाख 92 हजार 329 पैकी 1 लाख 27 हजार 623 एवढ्या नागरिकांना आयुष्यमान  गोल्डन कार्डचे  वाटप करण्यात आले आहे.  उर्वरित नागरिकांनी जवळच्या ग्रामपंचायतीचे सेतू सुविधा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र येथे जाऊन, तसेच आपल्या गावाच्या आशाताई मार्फत आयुष्यमान कार्ड काढण्याचे आवाहन जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

आज जिल्ह्यधिकारी जितेंद्र पापळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड वाटप करण्यात आले. 

जिल्ह्यांमध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत जिल्ह्यात 1 लाख 27 हजार 623 इतक्या नागरिकांना गोल्डन कार्ड वाटप करण्यात आले आहे, आयुष्यमान कार्ड घेणे गरजेचे आहे यामुळे गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचाराचा लाभ घेता येईल याकरिता जिल्ह्यात जास्तीत जास्त जनजागृती, समुपदेशन  व तपासणी या त्रिसूत्रीचा वापर करुन आयुष्यमान भव मोहीम यशस्वी करण्यात यावी. जिल्ह्यामध्ये 1 सप्टेंबर 2023 रोजी आयुष्यमान भव या मोहिमेचा शुभारंभ झाला. ही मोहिम 31 डिसेंबर 2023 पर्यंत चालणार आहे. केंद्र सरकारकडून  प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महाराष्ट्र शासनाकडून महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव करुन आयुष्यमान भारत योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत रुग्णांना पाच लाखापर्यंत आरोग्य विम्याच्या माध्यमातून 1209 उपचार, शस्त्रक्रिया मोफत दिले जात आहेत. जिल्ह्यात 1 सप्टेंबर 2023 रोजी या मोहिमेचा प्रारंभ झाला असून 31 डिसेंबर 2023 पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे, आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत आयुष्यमान आपल्या दारी, आयुष्यमान मेळावा आणि अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी करण्यात येणार आहे. कॅन्सर, हृदयरोग शस्त्रक्रिया, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार शस्त्रक्रिया, हिंदू व मज्जा संस्था विकार अस्थिव्यंग, जठर आतडे शस्त्रक्रिया, प्लॅस्टिक सर्जरी, जळीत, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, नेत्र शस्त्रक्रिया (मोतीबिंदू वगळून), कृत्रिम अवयव, फुफ्फुस आजारावर उपचार , एन्डोस्काईन इंटरव्हेक्शनल, रेडिओलॉजी आदी 1209 आजारावर मोफत  उपचार मिळतो. याचा लाभ घेण्यासाठी लाभासाठी रेशन कार्ड आवश्यक आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता चव्हाण यांनी केले. यावेळी  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा महाले, डॉ. नारायण भालेराव, डॉ. बालाजी भाकरे, डॉ. मंगेश टेहरे, डॉ.स्नेहल नगरे, डॉ. निशांत थोरात, जिल्हा समन्वयक डॉ. मोहसीन खान, जिल्हा प्रमुख महेश काकडे व सर्व आरोग्य मित्र, सुविधा व्यवस्थापक भारतभूषण रणवीर, डॉ. प्रशांत पुठ्ठावार, संदीप मुरकर, आशा क्षीरसागर, लतीफाबानू राठोरे , अनिता चव्हाण ,  ज्योती बांगर, रफिक, मदन इत्यादी उपस्थित होते.

******

No comments: