15 September, 2023

 

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त

औंढा नागनाथ येथे स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांच्या हस्ते 75 रोपांचे वृक्षारोपण

 



 

हिंगोली, (जिमाका) दि. 15  :  मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्ष 2023 निमित्ताने औंढा नागनाथ येथील वन पर्यटनात आज स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांच्या हस्ते 75 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले व स्वतंत्र सैनिक कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ व बेलाचे रोप देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी वनपरिमंडळ अधिकारी वाघ  व वनरक्षक, वनमजुर उपस्थित होते.

इको क्लब असलेल्या शाळेमध्ये वृक्ष लागवडी संबंधी जनजागृती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक वनीकरण विभाग हिंगोली अंतर्गत वनपरिक्षेत्र हिंगोली मधील सक्रीय इको क्लब असलेल्या शाळेमध्ये वृक्ष लागवडी संबंधी माहिती तसेच वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन वृक्ष संवर्धन विषयी माहिती देण्यात आली. तसेच मेरी माटी मेरा देश यावरही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षाचे महत्व पटवून देऊन रोपांचे वाटप करण्यात आले. वृक्षदिंडी काढून जनजागृती करण्यात आली. यावेळी शाळेतील इको क्लब सदस्य तसेच मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, वनीकरण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

******

No comments: