14 September, 2023

 

मराठवाडा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

हिंगोली नगर परिषद मार्फत घनवन वृक्षाची लागवड

 

 


हिंगोली (जिमाका), दि. 14 : माझी वसुंधरा अभियान 4.0,स्वछ सर्वेक्षण 2024, आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त हिंगोली नगर परिषद हिंगोलीच्या वतीने व प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री.अरविंद मुंढे  यांच्या संकल्पनेतून आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील  मोकळ्या जागेमध्ये नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली  घनवन वृक्षाची लागवड करण्यासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रर्माचे उदघाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन करण्यात आले.

या ठिकाणी 75 वा  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत वर्षानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात सुमारे 7500 वृक्षांची लागवड करुन दुसरे घनवन तयार करण्यात येत आहे. या परिसरामध्ये रोज सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात हिंगोली शहरातील नागरिक व्यायाम व फिरण्यासाठी येतात. याअनुषंगाने  त्यांना शुद्ध ऑक्सिजनची गरज लक्षात घेता वृक्षलागवड करणे अतिशय महत्वाचे आहे. म्हणूनच या परिसरामध्ये नगरपालिके मार्फत दुसरे घनवन तयार करीत आहोत. तसेच हिंगोली शहरातील सर्व नागरिक, विद्यार्थी, तरुण-तरुणी यांना विनंती आहे की आपण आपल्या परिसरामध्ये जितकी जस्त झाडे लावू शकता तेवढी झाडे आपण लावावी जेणेकरुन भविष्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळेल. तसेच याआधीसुद्धा पालिकेमार्फत विविध ठिकाणी घनवन तयार करुन मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली आहे. यातील 95 टक्के झाडे ही आज जिवंत असून मोठी झाली आहेत. याबाबत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी माहिती देवून नागरिक, विद्यार्थी, तरुण-तरुणी यांना आवाहन केले.

यावेळी मुख्याधिकारी अरविंद मुंढे, उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर, कार्यालयीन अधीक्षक देवीसिंग ठाकूर, स्वच्छता निरीक्षक बाळु बांगर,अनिकेत नाईक,रमाकांत बाच्छे, वसंत पुतळे,राजेश पदमने, लक्ष्मीकांत देशमुख, किशोर काकडे, आशिष रणसिंगे,गजानन कदम,गजानन बांगर,संजय दोडल,संदीप घुगे, नितीन पईनकर,विनय साहू, शिवाजी घुगे, कैलास थिटे, ,राजू असोले,पंडित मस्के, मनोज बुर्से,उत्तम जाधव,संघपाल नरवाडे,प्रविण चव्हाण,संघपाल नरवाडे,संतोष मेंडके,कुणाल कांबळे,रवी गायकवाड,चेतन भूजवने, आकाश गायकवाड,सजित शेख, नितीन पवार,रुपेश क्यातमवार,श्रीमती स्वाती अंतापुरकर,चित्र वर्मा,यांच्यासह नगरपालिकेतील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

 

*******

No comments: