21 September, 2023

 

बाल विवाह समूळ नष्ट करण्यासाठी वसमत तालुक्यातील लोण (बु.) येथे जनजागृती

 

हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्ह्यात बालविवाह समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली बालविवाह निर्मूलन समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी बालविवाह प्रतिबंधक अधिनियम-2006, ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्याविषयी जनजाग,ती करण्यात येत आहे. मुलांच्या काळजी व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून बालकांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील काही महसुली गावांमध्ये ग्राम बाल संरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

बालविवाहास प्रतिबंध करण्यासाठी ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात बालविवाह होऊ नयेत याबाबत खबरदारी घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी शाळेत 15 दिवस गैरहजर असेल तर संबंधित विद्यार्थ्यांची नोंद करुन ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्याकडे देण्याबाबत तसेच गावात ज्यांचे-ज्यांचे लग्न ठरले आहेत त्यांच्या वयाची पडताळणी करावी.

याच उद्देशाने जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील मौजे लोण (बु.) येथे ग्राम बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश पंडीतराव मोरे, चाईल्ड हेल्प लाईनचे प्रकल्प समन्वयक सदींप किशनराव कोल्हे, केस वर्कर राजरत्न संभाजी पाईकराव, विकास नथुजी लोणकर यांनी गावाचे ग्रामसेवक तथा बाल प्रतिबंधक अधिकारी एस. पी. भागवत यांना यापुढे या गावामध्ये बाल विवाह होऊ नये यासाठी जनजागृती करुन बाल विवाह समुळ नष्ट करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्याकडुन मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या, त्यानुसार सदरील गावातील ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी एस.पी. भागवत यांनी  दि. 6 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता मौजे लोण (बु.) येथे बाल विवाह प्रतिबंध कायदा अधिनियम 2006, बाल हक्क व संरक्षण या बाबत लोकांच्या, नागरिकांच्या मनात जनजागृती व्हावी या विषयी ग्राम बाल संरक्षण समिती लोण (बु) मार्फत रॅली, दवंडी इ. ची प्रभावीपणे वापर करुन यशस्वीरित्या जनजागृती केली.

यावेळी लोण (बु.) ता. वसमत जि. हिंगोली येथील ग्राम बाल संरक्षण समितीतील अध्यक्ष व इतर सदस्य पुढील प्रमाणे उपस्थित होते. सरपंच (प्रा.बा.सं.समिती अध्यक्ष) लक्ष्मीबाई गंगाधरराव मुळे, पोलीस पाटील गजानन अशोकराव सोनटक्के, अंगणवाडी सेविका शिला नवलाखे, आशा वर्कर ज्योत्सना भुसावळे, जि.प.प्रा. शाळाचे मुख्याध्यापक के.जे गांजरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बळीराम पांडुरंग मोकाशे, तंटामुक्ती अध्यक्ष नवनाथ किसनराव मुळे, बचत गट प्र. संगिता मुळे, जयश्री मुळे, म.स. प्रतिनिधी संगिता मारोती मुळे व वय वर्ष 18 वयोगटातील बालक बालिका इ. चा समावेश आहे.

******

No comments: