14 September, 2023

 

मराठवाडा मुक्ती संग्रामाचया अमृत महोत्सवानिमित्त शिक्षकांनी

एकापेक्षा एक सरस कविता सादर करत केला मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा जागर

 

कविता शिकवण्यापूर्वी विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता तयार करावी लागते

- कवी प्रा. इंद्रजित भालेराव

 

* शिक्षकांनी तयार केलेले व्हिडिओच्या माध्यमातून जिल्ह्याची संस्कृती, इतिहास अनेक लोकापर्यंत पोहोचवण्याचे काम करुया- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 





 

            हिंगोली (जिमाका), दि. 14 :  शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कविता शिकविण्यापूर्वी विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता तयार करावी लागते. केवळ परिक्षेसाठी म्हणून शिकवता एक आदर्श रसिक, जाणीव असलेला नागरिक बनवण्यासाठी शिकवले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले.

            मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त शिक्षण विभागाच्या वतीने येथील स्व. खा. शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित कवी संमेलनात मार्गदर्शन करताना प्रा. भालेराव बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के उपस्थित होते.

            यावेळी बोलताना प्रा. भालेराव म्हणाले, मुलूख माझा मराठवाडा आतून नाद निनादे या कवितेतून मराठवाडा मुक्तीसंग्रामात रानावनातला, तांड्यावरचा माणसाने कसा सहभाग घेऊन सहभाग घेतला होता याचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असे सांगून शिक्षक हा संस्कारक्षम भाषिक जाणीवेची माहिती देणारा असावा. विद्यार्थ्यांमध्ये कवितेची गोडी निर्माण केली पाहिजे. यासाठी शिक्षकांचे पाठांतर सतत चालू ठेवले पाहिजे. पाठांतर जेवढे जास्त तेवढे भाषेचे यशस्वी शिक्षक असतात. यासाठी मराठी वाङमयाचा समग्र इतिहास वाचायला हवे. शिषर्कातून कवितेचा अर्थ कळला पाहिजे.  तसेच त्यांनी विविध कवींच्या कवितांची उदाहरणे देऊन कवितेची पैलू सांगितले. शेवटी प्रा. भालेराव यांनी त्यांच्या माझा शेतकरी बाप, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, जन्म या कविता सादर करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

            याप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले, जिल्ह्यात मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा कार्यक्रम विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. त्याचाच भाग म्हणून आज अतिशय उत्कृट दर्जाचे कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षकांचे कवी संमेलन होत आहे. याचा मला मनापासून आनंद होत आहे, असे सांगून मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त शिक्षकांनी तयार केलेले व्हिडिओच्या माध्यमातून जिल्ह्याची संस्कृती, इतिहास अनेक लोकापर्यंत पोहोचवण्याचे काम करुया, असे सांगून सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामानिमित्त आयोजित कवी संमेलन हे लोकांनी लोकांसाठी तयार केलेला कार्यक्रम आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करुन शिक्षकांनी तयार केलेले व्हिडिओ आपण पाहून इतराना पाहण्यासाठी पाठवावे, असे आवाहन केले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी शिक्षकासाठी काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शिक्षकांनी तयार केलेल्या व्हिडीओमुळे हिंगोली जिल्ह्याचा इतिहास महाराष्ट्रासमोर ठेवणार असल्याचे सांगितले.

            यावेळी शिक्षक कवी दिलीप धामणे, सचिन गायकवाड, राजकुमार अंबरखाने, विजयश्री पवार, बबन दांडेकर, शेषेराव पडघन, शिलवंत वाढवे, दामोदर चौधरी, सिंधूताई दहिफळे, मिराबाई गणगे, ओमप्रकाश नागूलकर, चंद्रकांत कावरखे, पांडूरंग गिरी, शेख शफी, गणेश येवले, प्रिया धुमाळ, राजकुमार मोरगे, बबन शेळके, विशाखा सोनवणे, शिवदास पोटे, मारोतराव घेणेकर, रत्नाकर कटके, राजेश्वर पवार, तेजश्री गवळी, माधुरी चौधरी, फकिरा गायकवाड, प्रिया धुमाळ, मिनाक्षी चोंढेकर, एस. बी. देशमुख, रघुनाथ घुगे, निलेशकुमार होनाळे, कलानंद जाधव, लीना कारळे, वंदना दामले, अशोक सदावर्ते, शिवशरण रटकलकर, ज्योती नाईकवाडे, प्रीती नथवाणी, दुर्गा मस्के, अमोल देशमुख, कल्पना वानरे, रतन आडे, अंजली माने, विश्वनाथ भोकरे, बंडू पुरी  आदी शिक्षकांनी उत्साहपूर्ण वातावरणात एकापेक्षा एक सरस अशा आपल्या कवितेच्या माध्यमातून मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा जागर केला आहे.

            या कार्यक्रमाचे उदृघाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्विनी आसेगावकर आणि दीपक कोकरे यांनी केले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील शिक्षक, कवी प्रेमी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

No comments: